“दसरा मेळाव्याच्या आधीच राडा; नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप”

0
277

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदेंनी बंडखोरीकरत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे समोरासमोर आहेत.  त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवतीर्थावर होणार असून शिंदे गटाचा देखील मेळावा आज होत आहे. शिंदे गटाचा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी दोन्ही गटाने केली आहे. तसेच या मेळाव्याला 3 लाख माणसं येतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यासाठी बस, ट्रेन बूक करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : धनुष्यबाण कुणाचं?; कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता

ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी नाशिकहून काही महिला शिवसैनिकांची बस मुंबईच्या दिशेने येत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरून महिला शिवसैनिकांची बस जात असताना त्याच मार्गावरून शिंदे गटातील कार्यकर्त्यांची जीप जात होती. शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी चालत्या वाहनातून अश्लील इशारे केल्याचा आरोप ठाकरे गटातील महिलां शिवसैनिकांनी केला आहे. त्यानंतर पुढे जाऊन शिंदे गटातील कार्यकर्त्यांची गाडी आडवत महिला शिवसैनिकांनी त्या पुरूषांना चांगलाच चोप दिल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अजितदादा हे शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर त्यांचे स्वागतच; रामदास आठवलेंकडून ऑफर

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून आमंत्रण आल्यास दसरा मेळाव्याला येणार; आता शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले…

आदित्य ठाकरेंनी तोंड सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here