Home क्रीडा क्विंटन डिकाॅक, हार्दिक पांड्या, कायरान पोलार्डची तुफानी फलंदाजी; मुंबईचे हैदराबादसमोर 209 धावांचे...

क्विंटन डिकाॅक, हार्दिक पांड्या, कायरान पोलार्डची तुफानी फलंदाजी; मुंबईचे हैदराबादसमोर 209 धावांचे लक्ष्य

दुबई : आजच्या आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराईझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईझर्स हैदराबादला विजयासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 208 धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डीकाॅकने सर्वाधिक 39 चेंडूत 67 धावा केल्या. सुर्यकुमार यादवने 18 चेंडूत 27, तर हार्दिक पांड्याने 19 चेडूज 28 धावा, इशान किशनने 23 चेंडूत 31, पोलार्डने 13 चेंडूत 25 धावा, तर कृणाल पांड्याने 4 चेंडूत 20 धावा केल्या.

दरम्यान, सनराईझर्स हैदराबादकडून सिद्धार्थ काैलने 2, संदिप शर्माने 2, तर तर रशिद खानने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

‘हे’ तर मुंबईला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं गेलं- किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?- जितेंद्र आव्हाड

अखेर मुहूर्त ठरला ! महाराष्ट्रातील शाळा ‘या’ दिवसापासून सुरू होणार- बच्चू कडू

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय