दुबई : आजच्या आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा 10 विकेट्सनी पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावत 114 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक 47 चेंडूत 52 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने 4, जसप्रित बुमरा व राहूल चहरने प्रत्येकी 2, तर नॅथन कुल्टर नाईलने 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य केवळ 12.2 षटकात पूर्ण केले. मुंबईकडून सलामीला आलेल्या क्विंटन डीकाॅक व ईशान किशनने नाबाद 116 धावांची भागीदारी करत मुंबईला विजय मिळवून दिला. डीकाॅकने 37 चेंडूत 43 धावा केल्या. तर किशनने 37 चेंडूत 68 धावा केल्या.
महत्वाच्या घडामोडी-
ट्रेंट बोल्टची घातक गोलंदाजी; मुंबईने चेन्नईला 114 धावांत रोखलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला; जाहीर केलेल्या पॅकेजवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका
नाथाभाऊ काय चीज आहे हे तुम्हाला दाखवून देऊ- शरद पवार
पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत, म्हणजे राजकारणात मजा येईल- गुलाबराव पाटील