IPL 2021 24 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 172 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 18.3 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. यामध्ये मुंबईकडून क्विंटन डी कॉकने 50 चेंडूत 70 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर कृणाल पंड्याने 39 धावांची खेळी केली.
दरम्यान, रोहित शर्माने 14 धावांची आणि सुर्यकुमारची 16 धावांची खेळी केली. तर कायरन पोलार्डने नाबाद 16 धावा केल्या. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने 2 विकेट्स घेतल्या, तर मुस्तफिजूर रेहमानने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात; एम्स रूग्णालयातून दिला डिस्चार्ज
“पोलिसांना धमकावल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा”
चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील- किरीट सोमय्या
आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल