मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘राज्यातील करोनाची परिस्थिती आणि त्यामध्ये विरोधकांकडून वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या भूमिका यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलंय. लोकसत्ता डॉट कॉम’नं घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवार बोलत होते.
महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विरोधी पक्षांनी केंद्राकडे मांडायला हवे आहेत. भाषण तर कुणीही करू शकतं. पण भाषण करून चालणार नाही, आज जीव वाचवायचे आहेत. राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला, असं म्हणत रोहित पवार यांनी विरोधीपक्षावर टीका केली आहे.
राज्यात मुख्यमंत्री आणि सर्व पक्ष मिळून लढत आहेत. पैसे नसूनही उपलब्ध पैसा योग्य पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण केंद्राने जी मदत करायची होती ती केली नाही”, असंही रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र; म्हणाले…
“फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?”
करूणा धनंजय मुंडेच्या पुस्तक प्रकाशनापूर्वी वाद; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल
नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तुम्ही पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंत- गोपीचंद पडळकर