आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पणजी : गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे दोन पक्षही कंबर कसून तयारीला लागले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते लुईझिन्हो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर पक्षाच्या शिल्लक राहिलेल्या 4 पैकी 2 आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.
साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्याचे 17 आमदार निवडून आले होते. पण काँगेसने सरकार स्थापनेचा दावा करण्यास उशीर लावला आणि भाजपाने राजकीय खेळी करत सरकार स्थापन केले.
दरम्यान, भाजपाचे 13 आमदार निवडून आले होते. तेव्हापासून काँग्रेसच्या आमदारांना गळती लागली. सध्या काँग्रेसकडे फक्त 4 आमदार आहेत आणि त्यातले दोन भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“जळगावमध्ये संतापजनक कृत्य! हात-पाय बांंधून डाॅक्टर तरूणीवर परिचारकाचा बलात्कार”
कल्याणमधील खड्डे तातडीने भरा नाही तर तुम्हालाच खड्ड्यात भरू; मनसेचा इशारा
धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“आदित्य ठाकरेंकडून भाजप-मनसेचा करेक्ट कार्यक्रम; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”