Home महाराष्ट्र पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, 2 दिवसात मदत पोहचेल- शरद पवार

पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, 2 दिवसात मदत पोहचेल- शरद पवार

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुरातील महापुरामुळं झालेलं नुकसान न भरून येणारं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

राज्यात 16 हजार कुटूंबांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून त्यांना मदत देणार. 16 हजार किट तयार करणार. यामध्ये घरगुती भांडी, दोन प्लेट, दोन पेले, दोन वाट्या, दोन शिजवायची भांडी, एक तवा, एक चमचा, पोळपाट लाटणे असं किट राष्ट्रवादीने तयार केलं आहे. ते 16 हजार कुटुंबाला देणार., असं शरद पवार म्हणाले.

कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचंही वाटप केले जातील. राष्ट्रवादी काँग्रेसचा वैद्यकीय विभाग आहे, त्यांची 250 डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात जाऊन तपासणी करतील, औषधं देतील. गंभीर आजारी रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार केले जातील, असंही शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेत 2 दिवसांत संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकार मदत जाहीर करेल, अशी ग्वाही शरद पवारांनी यावेळी दिली.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण गावात अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी सरकार आणि जनतेच्या मदतीने गाव पुन्हा उभं केलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं उदाहरण आहे. त्या अनुषंगाने डोंगर कडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाचंही पुनर्वसन केलं जाईल, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून होर्डिंग बाजी”

“दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी साकार करावं”

राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील- राजेश टोपे

“…म्हणून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा”