Home महाराष्ट्र पुण्यातील निर्बंधामध्ये सूट देण्याची चर्चा, 1-2 दिवसात निर्णय होईल- गृहमंत्री दिलीप वळसे...

पुण्यातील निर्बंधामध्ये सूट देण्याची चर्चा, 1-2 दिवसात निर्णय होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : पुणे जिल्हा लेव्हल 3 मध्ये असल्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध कायम आहेत. जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. तसेच पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर चर्चा करुन पुढील 1-2 दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

आता जे निर्बंध आहेत, ते निर्बंध शिथील करण्याच्या दृष्टीकोनातून, काल आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली. महाराष्ट्रातील 11 जिल्हे लेव्हल 3 मध्ये आहेत. त्यात पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यात अजून निर्बंध शिथील करण्यास मान्यता दिलेली नाही. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं बोलणं झालेलं आहे. त्यामध्ये पुण्याला निर्बंधामध्ये काही सूट देण्याची चर्चा सुरु आहे. याच्याबाबत निर्णय एक- दोन दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, कृणाल पांड्यानंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा”

मदत म्हणा किंवा पॅकेज म्हणा पण तात्काळ घोषणा करा; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा योग्य मान सन्मान केला जाईल; गुलाबराव पाटलांची थेट ऑफर

‘या लोकांना महत्व देण्याची गरज नाही’; आमदार रोहित पवारांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर