“पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून होर्डिंग बाजी”

0
642

पुणे : सध्या पुण्यामध्ये होर्डिंग बाजी चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्स लागलेले होते. याला प्रत्युत्तर म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘लयभारी कारभारी’ असा उल्लेख करत होर्डिंग्स लावले होते. आता यामध्ये शिवसेनेनंही उडी घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील पुण्याच्या मुख्य चौकांमध्ये होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. या होर्डींग्जवर ‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार’, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, या होर्डींग्जवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी साकार करावं”

राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील- राजेश टोपे

“…म्हणून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा”

नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापाची अजित पवारांकडून दखल; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here