मुंबई : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अँटिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देत 50 हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, ‘कोरोना’ रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महत्वाच्या घडामोडी-
पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सिनबद्दल दिली ‘ही’ मोठी गुड न्यूज
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा; राज्यातील 58 पोलिसांना पुरस्कार
लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण
“पार्थ पवार आता अभिजित पवारांच्या भेटीला”