Home महाराष्ट्र पुण्यात राजकारण चांगलंच तापलं; मतदानाला काही तास बाकी असताना रवींद्र धंगेकरांचा भाजपवर...

पुण्यात राजकारण चांगलंच तापलं; मतदानाला काही तास बाकी असताना रवींद्र धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीचं आत्तापर्यंत तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना पुण्यात घडामोडींना वेग आलाय.

पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैशांचा वाटपाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांकडे केली आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, तुम्ही…

रवींद्र धंगेकर यांनी यासाठी पुण्यात सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. धंगेकर आपल्या मागणीवर ठाम आहेत. पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे.

गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहराच्या झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये भाजपचे आजी-माजी नगरसेवक, पालकमंत्री, आमदार पैसे वाटप करत आहेत. आमची माणसं तक्रार करतात तर त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

मी कलेक्टरला फोन लावला. आम्ही पुणे शहरातून पैशांची ही पाकिटं गोळा केली आहेत. पुणे शहरात भाजपवाले नागरिकांच्या दारासमोर हजारो आणि लाखो रुपये नेत आहेत. आमच्या जनतेचे चोरलेले पैसे अशाप्रकारे वाटप केले जात आहेत. हे पैसे काही नागरिकांना देण्यात आले होते. काही नागरिकांनी हे पैसे आमच्या हातात दिले. जोपर्यंत पैसे वाटप करण्याचं थांबत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही”, अशी भूमिका रवींद्र धगेकर यांनी मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Pune Lok Sabha ! भाजपकडून पुणे लोकसभा निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड

मतदानादरम्यान हातकणंगलेमध्ये दोन गटांमध्ये मोठा राडा; मतदान काही काळासाठी थांबवले

दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल ; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर