Home पुणे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचालींना वेग आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर  राहणार आहेत.

आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्देशाने राज ठाकरे पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखाध्यक्षांना नेमणूक पत्राचे वितरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, शुक्रवार सायंकाळी 5 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखा अध्यक्ष यांना नेमणूक पत्र वितरण देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शहर पदाधिकारी बैठक होणार आहे. यावेळी 9 शहर संघटक, 6 शहर सचिव, 9 विभाग सचिव बैठकीला उपस्थित असणार आहेत. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता 3 राज्य उपाध्यक्ष, 4 राज्य सरचिटणीस, 1 कार्यालयीन प्रमुख, 1 प्रसार माध्यम प्रमुख, 1 राज्य सचिव प्रवक्ता यांच्यासोबत बैठक होईल.

शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात भाजप-मनसेच्या युतीबाबत काही निर्णय घेणार का? याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पवार कुटूंबाला काय ठेका दिला आहे का महाराष्ट्र लुटायचा?; किरीट सोमय्यांचा घणाघात

अजित पवार आणि बहिणींवर आयकर विभागाच्या धाडी प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखीच, शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील”

“राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, पिंपरीचा महापाैर तेच ठरवतील”