Home पुणे अनंत चतुर्दशीला पुणे बंद, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार- अजित पवार

अनंत चतुर्दशीला पुणे बंद, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार- अजित पवार

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे प्रशासनानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पुण्यात अनंत चतुर्दशीला म्हणजे गणपती विसर्जनादिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अनंत चतुर्दशीला पुण्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत., अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात गणपती विसर्जना दिवशी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

“औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; MIM च्या 3 नगरसेवकांचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे 3 वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर, युतीसाठी आमची तयारी”

“कदाचित रावसाहेब दानवेंना शिवसेनेत यायचं असेल”

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनातली भावना बोलून दाखविली- देवेंद्र फडणवीस