आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर याचा निषेध करण्यासाठी पुणे बंदचे आयोजन करण्यात आलं होतं.
या पुणे बंदला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. भाजप खासदार उदयनराजे भोसलेही या बंदमध्ये सहभागी झाले होते. यावर आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत सदावर्तेंनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी यावेळी केली.
हे ही वाचा : शिंदे-फडणवीसांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, आता उद्धव ठाकरेंनी ठरवावं की…
सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितलं आहे की, बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आला. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर असल्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी, अशी मागणी सदावर्तेंनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“‘राज’ सरकार!; राज ठाकरेंनी केली मध्यस्थी, अन् ‘त्या’ पोलिसांचे निलंबन मागे”
मातोश्रीचा सोंगाड्या, जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री…; मनसेचा सुषमा अंधारेंवर पलटवार
शरद पवारांनी मदत केली नसती तर, आनंद दिघे हे कधीच…; जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान