Home महाराष्ट्र आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या; प्रवीण दरेकरांचं नवाब मलिकांना आव्हान

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या; प्रवीण दरेकरांचं नवाब मलिकांना आव्हान

मुंबई : महाराष्ट्राला रेमडेसिवीर   मिळू नये म्हणून केंद्र सरकारकडून कंपन्यांना धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मलिक यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे स्टेटमेंट केले आहे. रेमडेसिवीर देण्यात राज्य सरकारच अपयशी ठरले आहे. ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. त्यामुळे स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नवाब मलिक आरोप करत आहेत, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

तुम्ही हे वाचलात का?-

“परदेशातील लोकांना लस द्यायची आणि आपल्या देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकारचा धंदा”

इकडे मलिक एक बोलत आहेत तर आरोग्य मंत्री राजेश टोपे दुसरंच बोलत आहेत. राजकीय उद्देशानेच केवळ बोललं जात आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खालल्या जातंय, असं सांगतानाच मलिक यांनी नुसते आरोप करू नयेत. राजकीय स्टंटबाजी करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. त्यांनी पुरावे द्यावेत. अन्यथा राजीनामा देऊन माफी मागावी, असं दरेकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मलिकांनी पुरावे दाखविल्यास आम्ही महाराष्ट्राची माफी मागू, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

IPL-21 मुंबई इंडियन्स Vs सनरायझर्स हैदराबाद! मुंबईने टाॅस जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय

केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू- नवाब मलिक

“कोरोनाच्या काळात ‘गरीबांचा मसिहा’ बनलेल्या अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण”