लोकसभेत राहुल गांधींनी, भाजप खासदारांना दिलेल्या प्लाईंग किसवर, आता प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
371

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

राहुल गांधी यांच्यासह विरोधी बाकांवरील खासदारांनी मणिपूर प्रश्नावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, सभागृहात राहुल गांधींनी केलेल्या एका कृतीमुळे राजकीय वातावरण तापलं.

भाषण केल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभा सभागृह सोडलं. राहुल गांधी बाहेर पडत असताना त्यांच्या हातातल्या काही फाईल्स खाली पडल्या. त्या फाईल्स उचलण्यासाठी राहुल गांधी खाली वाकले. तेंव्हा तिथे बसलेले भाजप खासदार राहुल गांधींवर हसले. यानंतर भाजप खासदारांच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधींनी या सर्व खासदारांना पाहून फ्लाइंग किस दिलं. यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अघ्यक्षांकडे तक्रार दाखल केली. असभ्य वर्तनासाठी राहुल गांधींवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला खासदारांनी यावेळी केली. आता या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाच्या आमदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या बैठकीत मोठं वक्तव्य; म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत…

तुम्हाला द्वेष करण्याची एवढी सवय झाली आहे, की राहुल गांधींनी प्रेम आणि आपुलकीने केलेली कृतीही तुम्हाला समजत नाहीये. तुम्ही त्यांच्याविरोधात विष ओकत असताना, ते तुमच्याशी प्रेमाने वागत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी दिली.

राहुल गांधी सभागृहात बोलत असताना भाजपाचे सर्व मंत्री उभे राहिले होते. ते सर्वजण भाषणात अडथळा निर्माण करत होते. तरीही राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे पाहून प्रेमळ हावभाव (फ्लाइंग किस) दिले. याची त्यांना काय अडचण झाली. त्यांना द्वेष करण्याची एवढी सवय झाली आहे की, त्यांना प्रेम आणि आपुलकीने केलेली कृतीही समजत नाहीये. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांची खासदारकी तुम्ही रद्द केली. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांना तुम्ही घरातून हाकलून दिलं. ते खटला जिंकून आता परत आले आहेत. तरीही ते तुमच्याशी द्वेषपूर्ण वागत नाहीयेत. जेवढं विष तुम्ही ओकत आहात. त्यामुळे राहुल गांधींच्या कृतीची तुम्हाला अडचण होत असेल तर ती तुमची अडचण आहे, बाकी कुणाची नाही, असं प्रियांका चतु्र्वेदी म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंकडे नेतृत्व दिलं पाहिजे, तरच…; या नेत्याचं मोठं विधान

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? विजय वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया,म्हणाले…

“दादर हादरलं, धावत्या ट्रेनमधून तरूणीला खाली फेकलं, आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here