मुंबई : देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, असं म्हणत अहंकार बाजूला ठेवून देशात महाराष्ट्र मॉडेल लागू करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रशासन आहे. पंतप्रधान आहेत. आरोग्य मंत्रीही आहेत. पंतप्रधान जागेवरच आहेत. पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. त्यांनी अदृश्य होऊन चालणार नाही, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.
दरम्यान, प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. अहंकार आणि राजकारण विसरून जर बोलणी केली तर देश पुढे जाईल, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्रात नेहमीच उत्तम काम झालं आहे. त्यांना बदनाम करण्याचं कामही नेहमीच झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशात महाराष्ट्राने उत्तम काम केलं आहे. केंद्र सरकार, पंतप्रधान आणि देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल देशात लागू करायला हवं होतं, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्याने काय माशा मारायच्या का?”
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही- विनायक मेटे
चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचाराची गरज- अशोक चव्हाण