आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
तब्बल 156 जागांवर भाजपाने निर्णायक आघाडी घेतली आहे. काँग्रेस अवघ्या 17 जागांवर आघाडीवर आहे, तर आपला या निवडणुकीत 5 जागांवर आघाडीवर आहे. या विजयावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग; धैर्यशील मानेंना टक्कर देण्यासाठी ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
गुजरातमध्ये पुन्हा एकदा मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी गुजरामधील जनतेचे आभार मानतो. हा विजय कार्यकर्त्यांचा देखील आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच भाजपला ही मजल मारता आली, त्यामुळे मी कार्यकर्त्यांचे देखील आभार मानतो. गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आज जी आकडेवारी समोर आली आहे, ती भविष्यातील चित्र स्पष्ट करणारी असल्याचं म्हणत मोदींनी एकप्रकारे विरोधकांना इशारा दिला आहे. तसेच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आम्हाला काँग्रेसच्या तुलनेत एक टक्के मतदान कमी झालं. मात्र आम्ही हिमाचल प्रदेशच्या विकासासाठी सदैव कट्टीबद्ध राहू, असं मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
Election Result! “मोदींना मोठा धक्का; ‘या’ राज्यात काँग्रेस आघाडीवर”
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज ठाकरेंनी सांगितला उपाय, म्हणाले…