पंतप्रधान मोदींनी दानवेंच्या वक्तव्याची दखल घ्यावी; केंद्राने चीन-पाक सर्जिकल स्ट्राईक करावा- संजय राऊत

0
301

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून विरोध केला जात आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा यावेळी केला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, असं राऊत म्हणाले. तसेच शेतकरी आंदोलनाचं चीन-पाक कनेक्शन जोडणाऱ्या दानवेंनी पुरावे द्यावेत आणि केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक करावा, असंही राऊत यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“रावसाहेब दानवे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे”

“मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं निधन”

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचं धक्कादायक वक्तव्य

“सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here