नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी भारतीय भूमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी चीनसाठी त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला, असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला.
दरम्यान, पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवराच्या भागातून भारत आणि चीन दोघांकडून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु असताना राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. पँगाँग टीएसओमधील फिंगर फोरपर्यंत भारताची हद्द आहे. असे असताना, सैन्याला फिंगर तीन पर्यंत जाण्यास का सांगण्यात आलं? असा प्रश्न राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी
ही माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे- पंकजा मुंडे
हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही; शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी
परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरण, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“शर्जिल व एल्गार परिषदेसाठी ठाकरे सरकारकडून पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध”