मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. या याचिकेत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारलं असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही, असं सांगितलं आहे.
राज्यातील उद्धव ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून याचिकाकर्त्यांनं ही याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे मुंबईतील घटनांना अनुसरुन ही याचिका दाखल करण्यात आली होती.
केवळ मुंबईतील घटनांमुळे राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही. राज्य किती मोठं आहे, हे तरी तुम्हाला माहीत आहे का, असं म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावलं. सरन्यायाधीश बोबडे यांनी ही याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…पण खिसे गरम करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?; चित्रा वाघ यांची यशोमती ठाकूरवर टीका
“साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या”