Home महाराष्ट्र वादग्रस्त पोस्ट प्रकरणी आपली बाजू मांडताना केतकी म्हणाली, पवार म्हणजे…

वादग्रस्त पोस्ट प्रकरणी आपली बाजू मांडताना केतकी म्हणाली, पवार म्हणजे…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पवारांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच केतकीची जामीनावर सुटका झाली. यावेळी केतकीनं अटकेच्या काळात तिच्यावर झालेल्या कथित अत्याचारांबद्दल भाष्य केलं आहे.

केवळ फेसबुकवर एक पोस्ट कॉपी-पेस्ट करुन स्वत:च्या प्रोफाइलवर अपलोड केल्याने मला तुरुंगामध्ये टाकण्यात आल्याचा दावा केतकीनं यावेळी केला. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

हे ही वाचा : …या चार लोकांच्या कंडोळ्यांनी आमच्या उद्धवसाहेबांना बावळट केलं- गुलाबराव पाटील

पोस्ट केल्यानंतर काही वेळांनी पोलीस माझ्या दारात उभे होते. त्यांनी मला ताब्यात घेऊन अटक केली. या साऱ्या गोंधळामध्ये 20 ते 25 जणांनी माझी छेड काढली, माझ्यावर हल्ला केला, मला मारलं. शाईच्या नावाखाली माझ्यावर विषारी रंग फेकले, माझ्यावर अंडी फेकण्यात आली. केवळ माझ्यावरच नाही तर त्यांनी पोलिसांवरही हे हल्ले केले, असंही केतकीनं यावेळी म्हटलं.

मी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत पोस्ट केली होती. ते लोकांनी एखाद्या वेगळ्या अर्थाने घेतलं तर मी त्यात काहीही करु शकत नाही. मी केवळ काही यमक जुळवून केलेल्या (पोस्टसाठी) तुरुंगात होते. तसेच पवार म्हणजे धर्म नाहीत, असंही केतकी म्हणाली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शरद पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार केंव्हाही पडू शकतं, आता एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेनेचे आमदार फुटत होते आणि मला दुःख होत होतं- बाळा नांदगावकर

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून कितीतरी भाजपाचे नेते ढसाढसा रडायला लागले”