पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजप नेते व सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणराव काळे समितीच्या कोअर कमिटीमध्ये हा निर्णय झाल्याचं त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून समजलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा लवकरच कल्याणराव काळेंच्या फार्महाऊसवर स्नेहभोजनासाठी जाणार असल्याचीही माहिती कळत आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला