मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन शक्यता आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अमरावतीत रुग्णसंख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला करोना ग्रासलं आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीत या तीन शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शहरापुरता लॉकडाउन ठेवायचा की संपूर्ण जिल्ह्याला लागू करायचा याबद्दल अंतिम निर्णय होईल,” अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनवर 20 लाखांची बोली; RCB नं घेतलं आपल्या संघात
पूजा चव्हाण प्रकरणी अरुण राठोड ताब्यात?,अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
नंबर वन टी-20 फलंदाज डेव्हिड मलानवर 1.5 कोटीची बोली; पंजाबनं लावली बोली
मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला