प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की…- रुपाली चाकणकर

0
280

मुंबई : राज्यात कोरोना लसींचा मुबलक साठा आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नसल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत. आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की, त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही. वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो”, असंही रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर आधी जयंत पाटलांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला त्याचा खुलासा करावा”

“प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण?”

देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती की…; नितीन गडकरींचं भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दरेकरांचाही ठाकरे सरकारवर निशाणा; आकडे लपवले जात असल्याचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here