आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
उस्मानाबाद : जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथील प्रणिता मोहन पवार ही उत्कृष्ट कराटे पटू आहे. 2017 मध्ये तिने श्रीलंका येथे झालेल्या ऑलिपिंक स्पर्धेत कराटेमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं होतं. मात्र दीड वर्षांपूर्वी करोनामुळे प्रणिताच्या वडीलांचे निधन झालं आणि या कुटंबावर उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत आता प्रणिताच्या व तिच्या कुटुंबाच्या मदतीसाठी मनसेने पुढाकार घेतला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: प्रणिताची फोनवरून चौकशी केली आहे. शिवाय, तिचे पालकत्व घेण्याचाही निर्णय जाहीर केला.
हे ही वाचा : “कुछ मीठा हो जाये, सांगलीत जयंत पाटलांनी सदाभाऊ खोतांना भरवली कॅटबरी, चर्चांना उधाण”
दरम्यान, उस्मानाबादचे मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांनी प्रणिता पवार हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन तिचा राज ठाकरे यांच्याशी संवाद घडवून आणला. तसंच तिच्या आतापर्यंतच्या क्रीडा विषयक कामगिरीची माहिती घेतली. राज ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, प्रणिताचं शैक्षणिक पालकत्व ते स्वीकारत असल्याचे कुटुंबियांना सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“सोमय्यांना कोर्टाचा पहिला दणका; नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”
मी, मनसेच्या सगळ्या शाखांंना अन् मंत्र्यांना शिवरायांच्या संदेशाची पाटी पाठवणार- राज ठाकरे