Home महाराष्ट्र कोरोना लसींप्रकरणी प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्राची माफी मागा- सचिन सावंत

कोरोना लसींप्रकरणी प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्राची माफी मागा- सचिन सावंत

मुंबई : कोरोना लसींवरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील लशींचा अपव्यय 6% नसून तो केवळ 0.22% आहे. मोदी सरकारच्याच माहितीने जावडेकरांचा हा खोटारडेपणा उघड झाला आहे. चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंतांनी यावेळी केली.

कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र धैर्याने काम करत असून लसीकरणात महाराष्ट्राने देशासमोर आदर्श घालून दिला आहे. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे, ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले व लशींचा कमीतकमी अपव्यय ठेवला. परंतु, दु:ख याचे वाटते की जावडेकरांसारखे भाजप नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहेत, असं सचिन सावंत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा

“…तर लोकशाही संपली असं जाहीर करा”; नवाब मलिकांची चंद्रकांत पाटलांवर टीका

बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प- प्रवीण दरेकर

सांगलीत उद्या मध्यरात्रीपासून कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा