राष्ट्रवादी हा पक्ष बिनबुडाचा- प्रकाश आंबेडकर

0
181

अकोला : गेल्या 26 दिवसांपासून राज्यात नाटक सुरू आहे. राष्ट्रवादी हा पक्ष बिनबुडाचा आहे. तो कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. असा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलेला अंदाज आज अखेर खरा ठरला आहे. ते काल अकोल्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेसनेही शिवसेनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्रिपदासाठी पुढाकार घेतलेल्या शिवसेनेचा पोपट होऊ नये म्हणजे झालं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अॅड प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत सहभागी होण्याऐवजी एकट जाणं पसंत केलं होतं. त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस – राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता.

दरम्यान, काँग्रेस – राष्ट्रवादीचे राजकारण हे विश्वासाचे नाही, असा आरोप आंबेडकरांनी याआधीच केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here