मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे
राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी. pic.twitter.com/P31MTvJhb4
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 7, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजे भोसले यांना फोन; केली ‘ही’ महत्वाची विनंती
राजगृह तोडफोड प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली मागणी पोलीस आयुक्तांकडे ‘ही’ महत्वाची मागणी
एक शरद… सगळे गारद!; संजय राऊतांनी प्रसिद्ध केला मुलाखतीचा टिझर
“राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी”