पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार असल्याचे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितलं आहे.
प्रकाश आंबेडकर हे आज संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यात दाखल होतील. त्यानंतर वारकरी संघटनांसोबत बैठक होणार असून उद्या सकाळी ते पंढरपुरात दाखल होतील. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यानंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील, अशी माहिती आनंद चंदनशिवे यांनी दिली.
पंढरपूरच्या सर्व सीमा आणि विठ्ठल मंदीर परिसरात मोठा फौजफाटा पोलिसांमार्फत तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत. तसेच जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे.
दरम्यान, पंढरपूरकडे येणारी एसटी वाहतूक सेवा बंद करण्याचा प्रस्ताव पोलिसांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता, तो त्यांनी स्वीकारला आहे, अशी माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करून दिली माहिती
फक्त सत्तेच दार बंद झाल्याने भाजपचा घंटानाद; रूपाली चाकणकरांची भाजपवर टीका
दरोडेखोरांचा हल्ला; क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन
एमएसईबी कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन; म्हणाले…