पुणे : भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवण्याचा डाव आम्ही उधळून लावला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्यावेळी राजकीय परिस्थिती बदलली होती. त्यावेळी काही लोकांनी दंगली घडवल्या. आताही सत्ता बदलल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्याचा फायदा घेऊन काही लोकांचा भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवण्याचा डाव होता. आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून हा डाव उधळून लावला, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी भिमा कोरेगाव येथे जाऊन विजयी स्तंभाला अभिवादन केलं. तसंच अजित पवार यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका. जातीय सलोखा ठेवण्याची आपली परंपरा आहे, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
-“भीमा कोरेगाव हिंसाचाराला देवेंद्र फडणवीस यांची फूस होती”
-“तुम्ही संपूर्ण वेळ ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”
-‘हा’ नेता म्हणतोय शंभर टक्के सांगतो महायुतीचं सरकार पुन्हा येईल
-राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘हा’ आमदार देणार राजिनामा