मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सलग एक तास चर्चा झाली. या दोघांमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे मुद्दे
1. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहवर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत तपासाबाबत चर्चा झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांकडून तपासाबाबत सुरु आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
2. त्यानंतर कोळी, भोई या समाजाच्या मागण्यांबद्दल चर्चा झाली. बोगस सोसायटी बनवून मच्छीमारांना दिले जाणारे कॉन्ट्रॅक्ट चुकीचं आहे. हा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी बैठकीत उपस्थित केला.
3. गेल्या काही महिन्यात राज्यात अनुसूचित जातींवर अन्याय अत्याचार होत आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर-मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली.
महत्वाच्या घडामोडी-
एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं; त्यामुळे तुमचा अभ्यास पक्का करा- संजय राऊत
सांगलीत राष्ट्रवादीच्या ‘या’ कार्यकर्त्याची हत्या
गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर…- नारायण राणे