मुंबई : तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून तेजस्वी यादव यांचं कौतुक करण्यात आलं आहे
तेजस्वी यादव या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे”, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
दरम्यान, खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहारातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हे भाग्य भाजपस लाभले नाही. त्यामुळे सत्ता राखली याचा आनंद जरूर साजरा करता येईल, मात्र विजयाचा शिरपेच तेजस्वी यादवच्याच डोक्यावर आहे”, असंही सामनामध्ये म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त”
“ज्यांनी मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्या त्यांना वाचवायला बघत आहेत”
सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन