Home महाराष्ट्र शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल- अजित पवार

शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल- अजित पवार

मुंबई : वाढीव वीज बिल मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणं थांबण्यात येईल., असं अजित पवार म्हणाले.

आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचं समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, अजित पवारांनी वीज कनेक्शन तोडणी थांबवण्याची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि सरकारचे आभार मानले. फडणवीस म्हणाले,अतिशय योग्य निर्णयाची घोषणा केली, त्याबद्दल मी अजित पवार यांचे आभार मानतो.

महत्वाच्या घडामोडी –

“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, एकाला एक, दुसऱ्याला दुसरा न्याय नको- प्रवीण दरेकर

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांविरोधात अदखलपत्र गुन्हा”

सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू; पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका