आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात यावे, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी केली.
प्रवीण तोगडिया यांनी यापूर्वीही ही मागणी केली होती. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी तोगडिया यांनी केली आहे.
हे ही वाचा : संजय राऊत यांचा उद्या दिल्ली दाैरा, काँग्रेस नेत्यांची घेणार भेट; चर्चांना उधाण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर हिंदुत्वादी नेते म्हणून ओळख आहे. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी जाहीरपणे भूमिका स्पष्ट केली होती. राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी तोगडिया यांनी केली.
दरम्यान, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली. यात हजारो भाजप आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते सहभागी झाले. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत 16 व्या शतकात बांधण्यात आलेल्या बाबरीचा वादग्रस्त भाग पाडण्यात आला होता. त्यानंतर देशभर दंगली उसळल्या. त्यात जवळपास दोन हजार लोकांचा बळी गेला. हा इतिहास सर्वांना माहीतच आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या घडामोडी –
मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर; ‘या’ नेत्यानं केला गाैफ्यस्फोट
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रोज फोन करतो, पण ते माझा फोन उचलत नाहीत- नारायण राणे