मुंबई : सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जातं, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार काम करत आहे. या सरकारला सर्वसामान्यांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जनतेचा हा पाठिंबा पाहून काही लोकांना नैराश्य आलं आहे. त्या नैराश्यातूनच हे लोक राजकारण करत आहेत. आपल्याला सत्ता मिळाली नाही याचा संताप आणि अस्वस्थता हे लोक या माध्यमातून व्यक्त करत आहेत, असं शरद पवार म्हणाले
सत्ता गेल्यानंतर त्रास होतो हे मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी विरोधक काही शब्द वापरत आहेत. त्याला गांभीर्याने घेऊ नये, असा टोलाही शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
दरम्यान, मंदिर उघडण्याबाबत करण्यात आलेल्या राजकारणावर मी काही भाष्य केलं नाही. एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“आणखी एका भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरूण गोगाई यांचं निधन”
प्रताप सरनाईक काही साधुसंत नाही; सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा निशाणा