“उल्हासनगरमध्ये राजकीय भूकंप; भाजपचे ‘ते’ 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”

0
313

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उल्हासनगर : आगामी निवडणुकांच्या तोंडावर उल्हासनगर येथे राजकीय भूकंप होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.

टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओमी कलानी यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले असून हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा : छोटे पवार कमी पडले म्हणून मोठे पवार मैदानात उतरले; चंद्रकांत पाटलांचा टोला

4 वेळा आमदार झालेले पप्पू कलानी राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. मध्यरात्री तब्बल साडेतीन वाजेपर्यंत या नेत्यांमध्ये बैठक झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

दरम्यान, भाजपने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे .

महत्वाच्या घडामोडी – 

विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झालीये; नीलम गोऱ्हेंचा टोला

पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी येणार एकत्र?; चर्चांना उधान

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज अज्ञात व्यक्तीकडून हॅक; सायबर सेलकडे तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here