आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : नव्या पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या निवडीवरून भोर तालुक्यातील शिवसेनेत मोठा भूकंप घडला आहे. पक्षावर नाराजी व्यक्त करत सुमारे 58 पदाधिकाऱ्यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे विभागीय समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख सत्यवान उभे आणि जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर हल्लाबोल करत भोर तालुक्यातील पश्चिम विभागाचे तालुकाप्रमुख युवराज जेधे, युवासेना अधिकारी केदार देशपांडे, भोर शहरप्रमुख नितीन सोनावले व युवासेना शहराधिकारी किरण पवार आदींनी पदांचा राजीनामा दिला आहे. भोरमधील पत्रकार परिषदेत युवराज जेधे, केदार देशपांडे आणि नितीन सोनावले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
हे ही वाचा : “शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”
पदाधिकाऱ्यांच्या या नाराजीची जिल्हाप्रमुख चांदेरे यांनी तातडीने दखल घेत भोर तालुका गाठला असून संबंधितांशी चर्चा करून त्यांचे गैरसमज दूर करण्यात येतील. नाराज कार्यकर्त्यांनी राजीनामा देताना वरिष्ठांवर आरोप केले आहेत. त्या बाबत मुंबईत वरिष्ठांसमवेत बैठक घेऊन त्यांचा गैरसमज दूर केला जाईल. पक्षाचे नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. असं बाळासाहेब चांदेरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे विभागीय समन्वयक मिर्लेकर, संपर्कप्रमुख उभे आणि जिल्हाप्रमुख चांदेरे यांच्या कार्यपद्धतीवर आमची नाराजी आहे. त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही शिवसेनेतील पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षवाढीसाठी आम्ही सूचविलेल्या उपायांची वरिष्ठांकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. तसेच आमच्या पातळीवर जे प्रश्न सुटत नाहीत, त्याबाबत वरिष्ठांकडून हालचाली होत नाहीत. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिलेला आहे, असं युवराज जेधे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
राजकारणात कुणाला घाबरत नाहीत, पण देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती
शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; पालघरमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला सेनेचा भगवा
“… त्यामुळे 2024 ला मोदीचं सत्तेत येणार आहेत”