राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शरद पवारांचं 3 शब्दात उत्तर, म्हणाले…

0
342

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी केली, आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत प्रवेश केला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे.

अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?; पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?”

राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी स्मित हास्य करत तीनच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे. याबाबत महाराष्ट्रात होर्डिंगही लागत आहेत, असं म्हणत, शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार स्मित हास्य करत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे.”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?; मनसेच्या या नेत्याचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव

राष्ट्रवादीच्या फुटीवर अखेर शरद पवारांकडून शिक्कामोर्तब, म्हणाले…

“मोठी बातमी! सकाळी शरद पवारांच्या बैठकीला हजर राहणाऱ्याने ‘या’ आमदाराने दिला, अजित पवारांना पाठिंबा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here