Home महाराष्ट्र “केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना”

“केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना”

मुंबई : मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.

नारायण राणेंवर गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचं गांभीर्य पाहून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आलं आहे. राणेंच्या अटकेदरम्यान त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसंच हक्कभंग होणार नाही याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल असंही, दीपक पांडेय यांनी सांगितलं.

राज्यात तीन ठिकाणी राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत.

दरम्यान, नारायण राणेंनी मुख्मयंत्र्यांवर बोलताना त्यांची जीभ घसरली. ‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असं राणेंनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक”

आता या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये- अतुल भातखळकर

ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणं हेच राणेंचं पोट भरण्याचं साधन- निलम गोऱ्हे

“मी असतो तर कानाखाली लगावली असती; मुख्यमंत्र्यांवर बोलताना नारायण राणेंची जीभ घसरली”