मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या 2 पत्नी वाद प्रकरणी भाजप नेते आक्रमक झाले असून नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजप नेते करत आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील जी कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं आहे, एक म्हणणं धनंजय मुंडे याचं आहे. आपण कोर्टात गेल्याचं धनंजय मुंडे सांगत आहेत. असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. तात्काळ पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड
धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!लर
धनंजय मुंडे दोषी आढळले तर…; चित्रा वाघ आक्रमक