“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

0
435

मुंबई : वसईमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात राडा घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेनं केला. यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देत सरकार तसेच मुंबई पोलिसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक दाखवून देऊ, असं संदीप देशपांडे म्हणाले. पोलिसांनी सरकारच्या मध्यस्थींसारखे वागू नये, अशी विनंती संदीप देशपांडेंनी केली. तसेच महाराष्ट्रातील पोलिसांच्या पाठीशी नेहमीच मनसे उभी राहत आली आहे, अशी आठवणही संदीप देशपांडे यांनी यावेळी करून दिली.

दरम्यान, जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे. म्हणून ही गोष्ट सहन करतोय. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा, असंही देशपांडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, ही तर औरंगजेब सेना; भाजपचा सेनेवर हल्लाबोल

“किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी एकापेक्षा एक हाॅट माॅडेल्सचे फोटोशूट”

“कोरोनानंतर ‘या’ राज्यात आता बर्ड फ्लूचे थैमान”

“सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here