सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर त्याचा आज सातवा दिवस आहे. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून लोक घरातच बसून आहेत. तर काहीजण घरातून काम करीत आहेत. मात्र, काही लोक गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच परिणाम सांगली शहरात दिसून येत आहे.
मंगळवार सकाळपासूनच सांगली पोलीसांनी तब्बल 350 वाहने जप्त केल्या आहेत. सकाळी गाड्या ताब्यात घेतल्यानंतर संध्याकाळी ओळखपत्र दाखवल्यानंतर त्या पुन्हा संबंधित मालकाकडे सोपवण्यात येणार आहेत.
दरम्यान, लोक किराणामाल आणि भाजीपाला खरेदीसाठी जात असल्याचं पोलिसांना सांगत आहेत. त्यासाठी ते दुचाकी आणि चारचाकी घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र, लोक कारणं सांगून घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात
घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांचा काय दोष?, शरद पवार संतापले
करोनाबद्दलच्या ‘या’ अफवांवर विश्वास ठेऊ नका; शरद पवारांचं जनतेला आवाहन
अजिंक्य रहाणेनं कोरोनाग्रस्तांसाठी केली ‘इतक्या’ रुपयांची मदत