भिलवडी : सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावात 2 मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु मतदान केंद्राबाहेर अचानकपणे अनावश्यक गर्दी झाल्याने पोलिसांना लाठीमार करून गर्दी हटवावी लागली.
जिल्ह्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी चुरशीने व शांततेत मतदान सुरू होते. मात्र भिलवडीतील सेंकडरी स्कूल व ज्युनियर काॅलेजच्या बाहेर अचानकपणे लोकांची गर्दी होऊ लागली. मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांकडून वारंवार सुचना देण्यात येत होत्या. मात्र सुचना देऊनही मतदान केंद्रावरची गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे अखेर पोलिसांनी लाठीमार करून मतदान केंद्राबाहेरील गर्दी कमी केली. त्यानंतर मात्र मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा फाैजफाटा तैनात करण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी-
मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू- उर्मिला मातोंडकर
कदाचित भाजपला माझ्यापासून भीती वाटत असेल- आदित्य ठाकरे
उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींचे अवमूल्यन- प्रविण दरेकर
उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंकडून खास शुभेच्छा