पेट्रोल–डिझेल दरवाढीने मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलं- सतेज पाटलांची केंद्र सरकारवर टीका

0
188

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन केले आहे. यावरून गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्याच्या विविध भागात काँग्रेसच्या दिग्गज नेते-मंत्र्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. या अंतर्गत आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, दरवाढीचा निषेध करणारे फलक कार्यकर्त्यांनी याप्रसंगी हाती घेतले होते. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, दुसऱ्याच्या दुःखात सुख मानणारं हे सरकार आहे. मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडणारी, पेट्रोल डिझेल दरवाढ झाली असल्याने महागाई वाढणार आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; देशभरात आंदोलन

…तरच मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल; संजय राऊतांचा गडकरींना टोला

कोणाच्या धमकीला मी घाबरत नाही; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

“रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here