मुंबई : पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाल्याने या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे मात्र आता खतांच्या किमती प्रचंड वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. कोरोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे., असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे त्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद मिळेल हा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील. , असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे त्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद मिळेल हा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत- नवाब मलिक
डिअर राजीव, वुई विल मिस यू; राजीव सातव यांच्या निधनावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
राजीव सातव तू हे काय केलंस?, तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू; संजय राऊत भावूक