पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो सर्वांचा सन्मान करतो; आत्याकडून पार्थचं कौतुक

0
226

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवारांचा समाचार घेतला होता. यावर पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेली टीका नातू पार्थ पवार यांना जिव्हारी लागली असेल. पण, तो खूप संयमी आणि हुशार मुलगा आहे. तो घरात खूप चांगलं वागतो. सगळ्यांचा सन्मान करतो. त्यामुळे तो खूप मोठा किंवा वेगळा विचार करणार नाही, असं विजया पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा जेवढा आव आणला जातोय तसं काही घडलेलंच नाही. शरद पवार हे शरद पवार आहेत. त्यांना कोणालाही, काहीही सल्ला देण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्याला पक्ष पातळीवर सल्ला दिला आहे. आम्ही घरातीलही त्यांचे सल्ले घेतो, अशी ठाम भूमिका विजया पाटील यांनी मांडली.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

पार्थ प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

…त्यामुळे फडणवीसांनी तिकडेच राहावे; बिहारच्या प्रभारीपदावरुन काँग्रेसचा टोला

“महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कवडीचीही किंमत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here