मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न, नागरिकांनी घ्यायची काळजी, राज्यातील विकासकामं, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा अशा विविधी गोष्टींवर राज्य सरकारची भूमिका मांडत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही धोका अजून टळलेला नाही असं म्हणत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना काळजी घेण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. दरम्यान, कांजुरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी विरोधकांना साद घालत हवं असल्यास याचं श्रेय तुम्हाला देतो पण हा मुद्दा चर्चेतून सोडवूया, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मी आपल्याशी खोटं बोलणार नाही. मी ज्या खुर्चीवर बसलो आहे त्याचं महत्व जाणतो. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल असं एकही काम करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जनतेला विश्वास दिला.
महत्वाच्या घडामोडी-
“महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय”
“शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत”
“होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे”
अनेकजण डोळे लावून बसले होते, पण…; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला