सोलापूर : देशातील वाढत्या महागाईवरून सामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यातच पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. यावरून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
जनतेनं गेल्या वर्षी मोदी सरकार आणि सोलापूर महापालिकेत भाजपला मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं होतं, मात्र मोदी सरकार सत्तेत आलं आणि लोकांचा अपेक्षाभंग झाला., असा घणाघात प्रणिती शिंदेंनी यावेळी केला. त्या सोलापूरमध्ये घेण्यात आलेल्या युवक मेळाव्यावेळी बोलत होत्या.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि खाद्य तेलाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली असल्याचं प्रणिती शिंदेंनी यावेळी म्हटलं. तसेच भाजपवाल्यांनी सोलापूर महापालिकेचं वाटोळं केलं आहे. यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आता युवकांनी पु़ढाकार घेत सत्ताधारी भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असा हल्लाबोल प्रणिती शिंदेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“तुम्ही तुमचे इतिहासकार बोलवा, आम्ही आमचे अभ्यासक बोलावू, होऊन जाऊ द्या आमना-सामना”
महाराष्ट्रात मंदीरे बंदच राहणार हा उद्धव ठाकरेंचा ‘नया महाराष्ट्र’; नितेश राणेंची जहरी टीका
पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल
…तरी शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही; उदय सामंत यांचा भाजपवर हल्लाबोल