पुणे : माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपली कामं नीट करावीत. त्यांचा पगार आम्ही देतो. त्यांची बढती करण्याचं काम पण आम्हीच करतो. ते आमच्या चप्पला उचलतात, असं उमा भारती म्हणाल्या. यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजप नेत्या उमा भारती यांनी जी “नोकरशहा आमच्या चपला उचलतात”. अशी भाषा वापरली ही निषधार्ह आहे. जनतेच्या जोरावर ‘दुधा तुपाच्या गुळण्या करणाऱ्या भाजप नेत्यांनी स्वतः ला मालक समजणारी भाषा अधिकाऱ्यांशी, नोकरदारांशी करू नये’. योग्य वेळी लोक ही मस्ती निश्चित उतरवतील लक्षात असू द्या!, असा इशारा रूपाली चाकणकरांनी यावेळी दिला.
भाजप नेत्या उमा भारती यांनी जी “नोकरशहा आमच्या चपला लतात”. अशी भाषा वापरली ही निषधार्ह आहे. जनतेच्या जोरावर ‘दुधा तुपाच्या गुळण्या करणाऱ्या भाजप नेत्यांनी स्वतः ला मालक समजणारी भाषा अधिकाऱ्यांशी, नोकरदारांशी करू नये’. योग्य वेळी लोक ही मस्ती निश्चित उतरवतील लक्षात असू द्या! https://t.co/bXKdwInPEd
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
आता शरद पवारांबद्दल काही लोक खरं बोलत आहेत- गोपीचंद पडळकर
दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजपने एकत्र आलं पाहिजे- रामदास आठवले
“अखेर अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल”
सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही- दिलीप वळसे पाटील